Breaking News | Jalna : सध्या जालना शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली भागामध्ये गोळीबार (Firing in Mantha Chauphuli area of Jalna city) करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते गजानन तौर यांच्यावर तिघांनी गोळीबार केला आहे. यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Arjun Khotkar’s activist Gajanan Taur fired)
दुचाकीवरून तीन अज्ञात आले आणि गजानन तौर (Gajanan Taur) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये गजानन यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
भर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे यामुळे शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पथक नेमण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना त्यांना घटनास्थळी एक चाकू आढळून आल्याचे देखील माहिती समोर आली आहे.
50MP कॅमेरा आणि 5400mAh बॅटरीसह Realme C67 5G या दिवशी होणार लॉन्च!