Breaking News । शिवसेना आमदार अपात्रते (Shiv Sena MLA disqualified) संदर्भातचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हा निकाल देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कुणाचे आमदार अपात्र होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्येच आता आमदार अपात्रतेच्या निकाला आधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. (Maharastra News)
सर्वात मोठा धक्का म्हणजे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. 40 वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. आणि ते मंगळवारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
त्याचबरोबर दुसरा धक्का म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वायकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.