Breaking News । शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत राज्यांमध्ये नवीन सरकार स्थापन केले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दोन्ही गटांनी दावा दाखविला नंतर याबाबत सुप्रीम कोर्टात दोन्ही गटाने धाव घेतली. दरम्यान आता याबाबत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! आजपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी
खरी शिवसेना नेमकी कोणाची एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाचे? याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
PM Modi Birthday । नरेंद्र मोदींची संपत्ती किती? कोणकोणत्या मार्गाने कमावतात पैसे? वाचा
मागच्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला होता. त्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी सुनावणी झाली नव्हती मात्र आज यावर सुनावणी होणार असल्याने संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.
Diamond League । ‘गोल्डन बॉय’ला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकली संधी