Breaking News । महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? पाहा नेमकं काय म्हणाले राज्यपाल?

Changing School Timings In Maharashtra

Breaking News । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी राज्यातील शाळांच्या वेळाबाबत एक मोठा सल्ला दिला आहे. रमेश बैस म्हणाले, सध्या जीवनशैली बदलली आहे त्यामुळे सर्वांच्या झोपेची वेळ देखील बदलली आहे. मुलं मध्यरात्रीपर्यंत जागी असतात मात्र त्यांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावं लागतं. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. मात्र मुलांना चांगली झोप मिळावी या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करायला हवा असं रमेश बैस म्हणाले आहेत. (Changing School Timings In Maharashtra)

Shubman Gill । किक्रेटसह शुबमन गिल 22 वर्षाच्या मॉडेलसोबत उतरणार नवीन व्यवसायात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मंगळवारी राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना रमेश बैस यांनी हा सल्ला दिला आहे. राजभवनामध्ये मंगळवारी राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ या अभिनयाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी रमेश बैस यांनी भाषण दिले या भाषणात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपले मत मांडले आहे..

Maratha Reservation । मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस, मराठा आरक्षण वैध की अवैध? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी; संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

यावेळी बोलताना राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळा संदर्भात सूचना केल्या आहे. त्याचबरोबर ई-वर्गांना चालना देणे गरजेचे आहे या माध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार देखील हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल. असे देखील रमेश बैस यांनी नमूद केले आहे.

Sukhdev Singh Gogamedi । ‘राजस्थानमध्ये दिवसाढवळ्या पुन्हा गुंडाराज’ करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या, राज्यात आज बंदची हाक; प्रत्येक कोपऱ्यात पोलीस तैनात

Spread the love