Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! ५०० रुपये दंड आकारून राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

Breaking! Non-bailable arrest warrant against Raj Thackeray canceled with fine of Rs.500

मध्यंतरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी व चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान परळीच्या न्यायालयात ( Parali Court) तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते याप्रकरणी राज ठाकरे आज न्यायालयामध्ये हजर होते.

ऋषभ पंतला ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार रुग्णालयामध्ये; समोर आली महत्वाची अपडेट

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोर्टाने ५०० रुपयाचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केलं असल्याची माहिती वकील अर्चित साखळकर (Archit sakhalkar) यांनी दिली आहे.

बारामतीमध्ये ‘कृषीक 2023’ची जोरदार तयारी! 170 एकर परिसर होणार कृषिमय

2008 मध्ये एका प्रकरणात राज ठाकरे यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. यामुळे परळीमधील मनसे कार्यकर्त्यांनी धर्मापुरी पॉईंटवर दगडफेक केली होती. यानंतर राज ठाकरे व मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर सुद्धा राज ठाकरे न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक आयोग त्यांच्या घरचा आहे का? सुषमा अंधारे शिंदे गटावर आक्रमक

Spread the love
Exit mobile version