संजय राऊतांसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. शिवडी न्यायालयाने (Shivdi Court) संजय राऊतांविरोधात अजमीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मेधा सोमय्या (Medha Somayya) यांनी संजय राऊत यांच्या मानहानीचा खटला दाखल केत्या ला होता. खटल्यास राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे.
Raj Thackeray : जैन धर्मियांसाठी राज ठाकरे मैदानात!
आता याप्रकरणावर २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, ” शिवडी कोर्टाने #संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले कारण कोर्टात हजर न राहिल्याबद्दल. संजय राऊत यांच्या विरोधात डॉ मेधा किरीट सोमय्या बदनामी प्रकरणी कोर्टाने तक्रारदार मेधा सोमय्या यांचे तासभर जबाब नोंदवले. पुढील सुनावणी 24 जानेवारी”. असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Sewree Court issued Non Bailable Warrant against #SanjayRaut for not attending the court
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 6, 2023
Court recorded Complainant Medha Somaiya statement for an hour, in Dr Medha Kirit Somaiya defamation case against Sanjay Raut
Next hearing 24 Jan@BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
मोठी बातमी! संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला धक्का
दरम्यान, शंभर कोटींचा शौचालय घोटाळ्याच्या आरोप संजय राऊत यांनी सोमयांवर केला होता. त्यावरून संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.
“तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार” – शरद पवार