राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल होते . यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. अजित पवार हे पक्षाच्या सात आमदारांसह नॉट रिचेबेल असल्याचे अनेकांनी ट्विटही केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु होत्या मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गौतमी आली, मात्र झालं असं की कार्यक्रमच रद्द करावा लागला; पाहा नेमकं काय आहे कारण?
तब्बल 17 तासानंतर अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमाला त्यांच्या पत्नीसह उपस्थित राहिले. पुणे येथील खराडी या ठिकाणी एका ज्वेलर्सच्या उद्टघाटनासाठी अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांनी बंड केले नसून ते पुण्यात किंवा मुंबईतच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मोठी बातमी! पुण्यामध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची ‘ही’ तीन नावं आली समोर
मात्र, अजित पवार हे तास कुठे होते हा प्रश्न कायमच आहे? अजित पवार पुण्यात दाखल झाल्यामुळे बंड करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.