
आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. आजसुद्धा इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करण्यात आले आहेत. व्यवसायिक प्रति सिलेंडरमागे २५ रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे.
ही दरवाढ फक्त व्यवसायिक सिलेंडरमागे करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मागील पाच महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. दरम्यान, आजपासून १ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
याशिवाय व्यावसायिक वापरासाठीचा गॅस सिलिंडर १९ किलोचा असतो. यामुळे याच्या किंमती घरगुती गॅस सिलिंडरच्या तुलनेत जास्त असतात. सध्या दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर १७६९ रुपये आहे. याशिवाय कोलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे अनुक्रमे १८७०, १७२१, १९१७ रुपये इतका आहे.
कंगनाचे घर पाडण्यासाठी मविआ कडून लाखोंची लाच; एकनाथ शिंदे यांचा खुलासा