राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे लवकरच राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नारज असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे ते भाजपसोबत जाणार या चर्चेला देखील उधाण आले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना शिवसेनेत यावं असे आमंत्रण दिलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
शेतकऱ्यांची मुलं राहतायत बिनलग्नाची! शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय पुढाकार
अजित पवार भाजपमध्ये गेल्यावर कोणाला आवडणार नाही, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं असं म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवार यांना खुली ऑफरचं दिली आहे. ते इंदापुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचबरोबर अजित पवार हे सध्या चुकीच्या पक्षामध्ये असल्याचे देखील शिवतारे यांनी यावेळी म्हंटले आहे.
सावधान! अयोग्य वेळी अंडी खाणे पडू शकते महागात; जाणून घ्या अंडी खाण्याची योग्य वेळ
यावेळी बोलताना शिवतारे यांनी अजित पवारांचं कौतुक देखील केलं आहे. शिवतारे म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवारच चांगलं काम करत आहेत. बाकी सगळी लुटारूंची टोळी असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
गँगस्टर अतिक आणि त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आले समोर!