Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Breaking! Pankaja Munde will go to NCP? Inciting discussions in political circles

मागच्या काही दिवसापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) पुन्हा एकदा पक्षावर नाराज दिसत आहेत. इतकंच नाही तर खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. दरम्यान आज भाजपचे दिवंगत दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

टॉयलेटमधून बाहेर आले अन् चारही बाजूने प्रेतांचा खच; ट्रेन आघातातुन बचावलेल्या एका महिलेने सांगितलती आपबीती

यावेळी या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत जाणार का? या प्रश्नावर देखील भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.

Gmail वरील नको त्या Emails मुळे झालाय त्रस्त? जाणून घ्या सर्व ईमेल एकत्र डिलीट करण्याचं टेक्निक

त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या, पहिल्या पाच वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार वेगळे आहेत, मी मनात साठवून काहीही ठेवत नाही, मी एकदम स्पष्ट भूमिका मांडत असते. मुंडे साहेबांनी भाजपला सत्ताशिखरावर पोहोचवलं. माझे शब्द ठाम आहेत. राजकारणात कधी कधी कीर्तन केलं पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

धक्कादायक घटना! मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी

त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. अमित शहा माझे नेते आहेत. असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; दोन बड्या शिलेदारांसह शेकडो समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love
Exit mobile version