सध्या वातावरणामध्ये अनेक बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी ऊन पडत आहे तर काही ठिकाणी ढगाळ स्वरूपाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये काल चांगला पाऊस झाला आहे. तसेच आज देखील मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
धक्कादायक! एकाच रात्रीत 19 जणांना सापाने घेतला चावा; परिसरात भीतीचे वातावरण
मुंबईननंतर आता पुण्यातील कात्रज, कर्वे नगर, चांदणी चौक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबईत देखील आज सकाळपासून पावसाने हाजरी लावली आहे. मुंबईतील दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल या परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ७२ तासात सलग मान्सून मुंबईत दाखल होईल.
प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसचा टायर फुटला अन् झाला भीषण अपघात; १२ जण जखमी