
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान, राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
सगळे पवार चांगले..! त्यांची पॉवर कायम अशीच राहो; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चर्चेत
आंबोली पोलिसांनी राखी सावंतला आज ताब्यात घेतले होते. यानंतर तब्ब्ल सहा तासाच्या चौकशीनंतर तिची सुटका झाली आहे.दरम्यान, बऱ्याच दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्यावर शर्लिन चोप्राने आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी राखी सावंतला अटक करण्यात आली होती. आता तब्बल ६ तास पोलिसांनी तिची चौकशी केल्यांनतर तिला सोडले आहे.
राखी सावंतच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली, “तिचा पती माझ्याकडे…”
दरम्यान नोव्हेंबर २०२२ मध्ये महिला मॉडेल शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सतत प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे आज पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली.