रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा वेड चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाच्या संवादाचं लेखन लेखक प्राजक्त देशमुखने केलं आहे. सध्या प्राजक्त देशमुख बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
6 फेब्रुवारीपासून मिळणार दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट
मुंबई-नाशिक हायवेवर प्रवास करताना प्राजक्त देशमुखच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आता हिच घटना व अपघाताचा व्हिडीओ प्राजक्त देशमुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?१/ज्ञ pic.twitter.com/uaJSasmXey
— Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख (@Prajaktdeshmukh) February 3, 2023
मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी धोक्यात?
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम? असं ट्विट त्याने केलं आहे.
अडवणूक करून शेतकऱ्यांची लूट! ऊसतोडणीसाठी मुकादम स्वतःच ठरवू लागलेत दर