Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली; राहुल गांधी भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले

Breaking! Sonia Gandhi's health deteriorated; Rahul Gandhi reached Delhi to meet

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ( National Congress Party) भारत जोडो यात्रेची चर्चा देशात सर्वत्र सुरू आहे. राहुल गांधी हे या यात्रेचे नेतृत्व करत आहेत.या यात्रेदरम्यान राहुल गांधी व सोनिया गांधी यांचे बरेच व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. अशातच सध्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Soniya Gandhi) या आजारी पडल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी यांना व्हायरल रेस्परेटरी इन्फेक्शमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेजुरीमधील बाजारात चक्क गाढवांची किंमत लाखोंच्या घरात! ‘असा’ होतो व्यवहार…

भारत जोडो यात्रा सध्या हरियाणा ( Hariyana) येथे पोहीचली आहे. मात्र सोनिया गांधी यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळताच राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शुक्रवारी ( दि.6) राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेत(Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत.

मांढरदेव यात्रा कालावधीत प्रतिबंध आदेश; पशुहत्या होऊ नये यासाठी प्रशासन तत्पर

याआधी देखील ऑगस्ट महिन्यातसुद्धा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. यावेळी राहुल गांधी यांना तातडीने दिल्लीला जावे लागले होते. त्यावेळेही सोनिया गांधी यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये पोहचली आहे.

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा राडा; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना झाली कैद

Spread the love
Exit mobile version