
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोजपुरी गायक पवनसिंहवर (Bhojpuri singer Pawan Singh) कार्यक्रमामध्ये दगडफेक झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. प्रेक्षकांनी एक गाणं गाण्याची विनंती मात्र गायकानं गाणं गाण्यास नकार दिला यावेळी संतापलेल्या प्रेक्षकांनी थेट भोजपुरी अभिनेता आणि गायक पवनसिंहवर तुफान दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून झुनझुनवाला यांनी कमावले 650 कोटी
या दगडफेकीमुळे उत्तर प्रदेशातील बलिया शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या हल्ल्यामध्ये गायक पवनसिंहला जबर मार लागला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून ती गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आफताब श्रद्धा प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती
माहितीनुसार, या दगडफेकीमध्ये पवनसिंहच्या तोंडाला जबर मार लागला आहे. यांनतर तेथील उपस्थित लोकांनी ताबोडतोब पवनसिंहला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.