साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर (Mahesh Babu) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील कृष्णा यांचे आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. माहितीनुसार, महेश बाबूच्या वडिलांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
धक्कादायक! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाला यावेळी डॉक्टरांनी काळजी घेण्यासारखे काही नाही असे सांगितले. पण अचानक रूग्णालयात त्यांना कार्डीआक ॲटॅक आला व वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉंक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते.
महत्वाची बातमी! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये; वाचा सविस्तर
महेश बाबूच्या वडिलांना टॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. त्याच्या वडिलांचे पूर्ण नाव कृष्णा घट्टमनेनी आहे. त्यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते एक दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही देखील सन्मानित करण्यात आले होते.