
शिंदे गट आणि ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल ( Sttasanghrsh Result) आज लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. यामुळे त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
तसेच येत्या १५ तारखेला घटनापीठातील ५ न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होत आहेत. त्यानंतर कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. यामुळे न्यायमूर्ती एम.आर.शाह निवृत्त होण्यअगोदर सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, हे निश्चित आहे. दरम्यान हा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील ( Maharashtra) राजकीय स्थिती काय असणार यावर देखील विविध अंदाज बांधले जात आहेत.
शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाले तरी भाजप-शिंदे गटाकडे विधानसभेतील बहुमत असणार आहे. मात्र ही बाजू भक्कम असली तरी त्यात शिंदेंचे आमदार पद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे अपात्र झाले तर शिंदे- फडणवीस सरकार कोसळू शकते. त्यानंतर बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले जाईल. मात्र नवीन मुख्यमंत्री कोण असेल ? याबाबतचा निर्णय भाजपचा असणार आहे.
“…म्हणून फडफडतात डोळ्यांच्या पापण्या”; ‘हे’ आहे खरे वैज्ञानिक कारण