
कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्यातील ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास तयार आहेत. महाराष्ट्रात राहून देखील आम्हाला सोयीसुविधा मिळत नाहीत मग इथे राहून काय उपयोग? आपल्या गावांचा कर्नाटकात समावेश झाला तर काय चुकीचे होईल? अशी भूमिका अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
1000 इंजिनिअर्स तरुणांना मिळणार नोकरीची संधी; ‘या’ मोठ्या कंपनीने जाहीर केली भरती
अक्कलकोट तालुक्यातील तळवळ, शेगाव, कुमठे, केगाव खुर्द, चिंचोलीनजीक, सुलेरजवळगे, मुंडेवाडी, धारसंग, आळगे, गुड्डेवाडी, अंकलगे, पानमंगळूर, करजगी, खानापूर, म्हैसलगी, हिळळी, केगाव बुद्रुक तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा, औराद, बरूर, हत्तरसंघ, कुडल, कुरघोट, लवंगी, बाळगी, कोर्सेगाव, भंडारकवठे, तेलगाव, चिंचपूर, टाकळी ग्रामस्थांनी कर्नाटकमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या सरपंचाने कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या लेटरपॅडवर निवेदन तयार करून ठेवावे. लवकरच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ते देऊ, असे आवाहन करण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही काढणार संवाद यात्रा