टिकटॉक अॅप जगभरात लोकप्रिय अॅप म्हणून ओळखले जायचे. भारतात देखील या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. मात्र या अॅपवर भारताने आता बंदी घातलेली आहे. भारतानंतर अनेक देशांनी टिकटॉकवर बंदी घातली यामध्येच आता अमेरिका, युरोप, कॅनडा डेन्मार्क आणि ब्रिटननंतर न्युझीलंडमध्ये (New Zealand) देखील टिकटॉक ॲपवर बंदी घातली आहे. ही बंदी सरकारी उपकरणांवर घालण्यात आली आहे. न्युझीलंडच्या संसदेत याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे.
राज्यभर पुन्हा एकदा पाऊस थैमान घालणार, हवामान विभागाची माहिती
चीनी कंपनी असलेल्या बाइटडान्सच्या हा सोशल मिडीया अॅप सुरक्षित नसल्याने यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी टिकटॉकवर सरकारी डेटा आणि माहिती धोक्यात येत असल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा
दरम्यान, भारतात 2020 मध्ये टिकटॉक हे खूप ट्रेंडिगला होते. तरुणांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे लोक भारतात टिकटॉक वापराचे मात्र हे चिनी अॅप असल्याने सुरक्षिततेचा विचार करून भारताने 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी घातली. आता अनेक देशामध्ये टिकटॉक बंद करण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे.
जनावरं चारण्यासाठी गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला; मुलाचा जागीच मृत्यू