ब्रेकिंग! ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन

Breaking! Veteran singer Vani Jayaram passed away

पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ गायिका वाणी जयराम (Veteran singer Vani Jayaram) यांचे चेन्नईमधील (Chennai) राहत्या घरी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ७८ व्य वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास १०,००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला अडकणार विवाहबंधनात!

ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांना 25 जानेवारी रोजी पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) देण्यात आला होता. त्याच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी ज्येष्ठ गायिका वाणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश

ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यामध्ये, तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, मल्याळम, बंगाली, भोजपुरी, मराठी, तामिळ या सर्व भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि ओडिसा या राज्यांच्या राज्य पुरस्कारांनी देखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

महत्वाची बातमी! भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *