मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसासह गारपीठ देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे, केळी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने पुन्हा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ टीकेचा गौतमीने घेतला समाचार; म्हणाली, “महाराज फक्त…”
७ एप्रिलपर्यंत राज्यातील काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा देण्यात आला आहे. दरम्यान, आज विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
चिंताजनक! कोरोनाच्या चौथ्या लाटेचे होतेय आगमन?
यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. एककीकडे पिकाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घ्या असं आव्हान कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे.
तब्बल १२ तास पाण्यावर तरंगले बाबा, पाहण्यासाठी लोकांनी विहिरीजवळ केली तुफान गर्दी