मागच्या काही दिवसापासून राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार भाजपमध्ये जाणार (Ajit Pawar will join BJP) अशा चर्चा सुरु होत्या. त्यांनतर शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली (Sharad Pawar announced his retirement) आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच कायदेतज्ज्ञ (Asim Sarode) असीम सरोदे यांच्या ट्विटने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी ट्विट करत एक मोठा दावा केला आहे. ट्विट करत त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.” असे ट्विट त्यांनी केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
त्यांच्या या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता खरंच ११ मे नंतर नवीन सरकार स्थापन होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील.
— Asim Sarode (@AsimSarode) May 3, 2023
11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.