
मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला.
एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे
आता चिन्ह आणि पक्ष जाताच यांनतर पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे. आता विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप बजावला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांना सुद्धा हा व्हीप लागू होणार आहे. त्यामुळे जर व्हीप स्वीकारला नाहीतर याबाबत अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंची आमदारकी जाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंह कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “माझ्याकडे अजित पवार…”
दरम्यान, विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकीला सर्व आमदारांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ठाकरे गटाचे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होणार का? असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाकरे गटाला दिलासा नाहीच! तातडीनं सुनावणीस करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार