उर्फी जावेद ( Uorfi Javed) ही तिच्या अजब गजब लूकमुळे ओळखली जाते. तिचे अतरंगी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील उर्फीची प्रचंड फॅन फॉलोविंग ( Uorfi’s Fan following) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उर्फी जावेदने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फीच्या बोल्ड फोटोशूट ( Bold photoshoot) मुळे ती कायम चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे तिच्यावर नेहमीच टीका केली जाते.
लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या किती जागा? महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या…
उर्फी कायमच तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते. तिच्या कपड्यांमुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या आहेत. मात्र उर्फीने याकडे काही लक्ष दिलेले नाही. आता तर चक्क उर्फी जावेद हिच्या विरोधात काही महिला या रस्त्यावर आल्या आहेत. इंदूरमधील महिलांनी उर्फी जावेद हिच्या विरोधात मोर्चा काढला आहे.
या महिलांनी फक्त मोर्चाच नाही तर उर्फी जावेद हिला खास कपडे देखील पाठवले आहे. उर्फीच्या विरोध काढलेल्या या मोर्चामध्ये महिलांनी हातामध्ये काही पोस्टर देखील घेतले होते. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, नग्नता प्रकार योग्य आहे का? सध्या या मोर्चाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. आता याला उर्फी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर