आयुष्यात किमान एकदातरी माणूस प्रेमात (Love) पडतोच. कारण आपले सुख दुःख शेअर करण्यासाठी प्रत्येकालाच हक्काच्या व्यक्तीची गरज असते. मात्र सगळीच नाती (Relationship) टिकतात असे नाही. खूपदा वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा नात्यात झालेल्या वादांमुळे नाते तुटते. याला आपण सोप्प्या भाषेत ब्रेकअप (Breakup) असे म्हणतो. ( 5 tips to overcome breakup)
UPSCचा निकाल जाहीर! यंदा मुलींचीच बाजी; ठाण्याची डॉ. काश्मिरा संखे आली राज्यात प्रथम!
खरंतर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत असतो तेव्हा आपण त्याव्यक्तीमध्ये भावनिकरित्या फार गुंतलेलो असतो. अशावेळी ब्रेकअप झाले तर बरेच लोक भावनिकरित्या कोलमडून जातात. त्यांना रोजच्या आयुष्यात रिकामेपण जाणवू लागते. मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो. अशा वेळी त्या परिस्थितीमधून बाहेर कसे पडावे. याबाबत आज आम्ही पाच सोप्प्या टिप्स देणार आहोत.
१) सतत त्याच व्यक्तीचा व तिच्या आठवणींचा विचार करु नका
ब्रेकअप झाल्यानंतर कोणत्याही जुन्या आठवणींचा सतत विचार करत बसू नका. तसेच त्या आठवणींना विसरण्याचा देखील प्रयत्न करू नका. स्वतःच्या मनावर ताण येईल असे काही करू नका. मनाला मोकळे ठेवा. इतर गोष्टींचा विचार करा. नवनवीन गोष्टींमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करा.
२) आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवा
ब्रेकअपनंतर मनात वेगवेगळे विचार येत राहतात. तुम्हाला मानसिक त्रास होत असतो. अशावेळी साहसा एकटे राहू नका. यावेळी तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांच्याजवळ तुमचे मन बिनधास्तपणे मोकळे करा.
३) विनोदी व्हिडिओ किंवा कार्यक्रम पहा
ब्रेकअपनंतर लोक सतत निराश राहतात. मात्र यामुळे तुम्ही मानसिकरित्या अजून खचून जाता. अशावेळी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ विनोदी व्हिडिओ किंवा कार्यक्रम पाहत रहा.
४) मनातील गोष्टींचे शेअरिंग वाढवा
ब्रेकअपनंतर मानसिक तणाव येतो. यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशावेळी तुम्ही स्वतःला फार एकटे समजता. मात्र याकाळात तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर करायला हव्यात. यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकता.
५) योगा किंवा इतर आनंद देणाऱ्या गोष्टी करा
ब्रेकअप नंतर आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी तुम्ही योगा किंवा मेडिटेशन करु शकता. तसेच ट्रेकिंगला जाणे, हवापालट म्हणून फिरायला जाणे, आवडीची पुस्तके वाचणे, चित्रपट बघणे यांसारख्या आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टी करू शकता.
मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “जेवल्याशिवाय आमंत्रण…”