
Breaking News । : सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तेलगु देशम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्राबाबू यांच्या अटकेमुळे आंध्र प्रदेशातील राजकारण तापण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आज पहाटे चंद्राबाबू नायडू झोपेत असताना सीआयडीच्या टीमने त्यांना अटक केली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि डीडीपीचे नेते नारा लोकेश यांना देखील अटक करण्यात आली आहे.
डीडीपीच्या सोशल मीडियाने याबाबतची माहिती दिली असून लोकेश यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. लोकेश चंद्राबाबू यांना भेटू शकत नाहीत असे देखील पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे आता आंध्र प्रदेशमधील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Mumbai Rain । मोठी बातमी! मुंबईमध्ये पडतोय मुसळधार पाऊस; वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद