Site icon e लोकहित | Marathi News

ब्राईट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जु.कॉलेज खडकी ता.दौंडच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन आणि एमएच-सीईटी मध्ये यश संपादन!

Bright Future English Medium School and Junior College Khadki T.Daund students success in JEE Main and MH-CET

दौंड : जेईई मेन (JEE Main) या परीक्षेच्या निकालामध्ये ब्राईट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जु. कॉलेजचा तेजस रवींद्र ससाणे हा विद्यार्थी जेईई मेन मध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याचबरोबर विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता सुरेश थोरात हिने देखील एमएच-सीईटी (MH-CET) मधे ८५ टक्के गुण मिळवले आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना! ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य

जेईई मेन (JEE Main) आणि एमएच-सीईटी (MH-CET) या अत्यंत कठीण परीक्षा आहेत. या परीक्षेच्या तयारीसाठी बरेच विद्यार्थी महागडे कोचिंग क्लास लावतात. पण विद्यालयाचा विद्यार्थी तेजस ससाणे आणि विद्यार्थिनी निकिता थोरात यांनी कोणत्याही प्रकारचे बाहेरचे क्लासेस लावले नव्हते. या दोघांनीही कॉलेजच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घरीच अभ्यास करून हे यश मिळविले आहे. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष राजु गायकवाड, खजिनदार तुषार काळे यांच्या हस्ते करण्यात सत्कार आला. यावेळी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळा, संस्था आणि शिक्षकांचे देखील आभार मानले.

Pune: उद्यापासून पुण्यातील ‘ही’ बँक होणार कायमची बंद, कारण…

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजु गायकवाड म्हणाले, “विद्यार्थ्यांनी प्रामाणिक पणे, अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते, त्यांच्या या यशात आई, वडील, तसेच इतर मित्रपरिवाराचा देखील वाटा असतो, तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका हे शिक्षक बजावतात”. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये ज्या शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे त्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसही शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका राधिका यांनी केले.

sharad pawar: “चार, आठ, दहा दिवसात पत्राचाळ प्रकरणाची चौकशी करा “, शरद पवारांनी राज्य सरकारला केलं आवाहन

Spread the love
Exit mobile version