मुंबई : देशाचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. यामध्ये सामन्यांना दिलासा दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प (Budget 2023-24) आज सादर होणार आहे. यामधील महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा प्रशासक महापालिकेचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रीपद पदरात पडले नाही; अजित पवारांचा खुलासा!
हा अर्थसंकल्प अगामी निवडणुकांच्या आधी सादर केला जातोय. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची धाकधूक देखील वाढली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आज महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुंबईकरांच्या (Mumbai) अपेक्षा हा अर्थसंकल्प पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ब्रेकिंग! अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर
मागच्या वेळी महापालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 ला संपल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. आता महापालिका निवडणुका अगदी तोंडाशी आल्यात. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी जोमात मोर्चेबांधणी केली आहे. अशातच अर्थसंकल्पात नक्की काय असणार? त्याचा मुंबईकरांवर काय परिणाम होणार याकडे राजकीय पक्ष डोळे लावून आहेत.
ब्रेकिंग! अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर