Buldhana Accident News । बुलढाणा : सध्या अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान सध्या देखील बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला आहे.
ऐकावे ते नवलच! तलाठ्याने घेतली लाच अन् समोर पोलीस दिसताच केलं भयानक कृत्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस राजुरा घाटात पलटी झाली या बस मध्ये जवळपास 55 प्रवासी प्रवास करत होते. त्याचबरोबर वीस शाळेची विद्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. या घटनेबाबत समजतात तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. (Buldhana Accident News )
Government scheme । आनंदाची बातमी! ५०% अनुदानावर आजच करा शेळीपालन, काय आहे योजना? जाणून घ्या
आज सकाळी १०:१५ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. या बस मध्ये 55 प्रवासी प्रवास करत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यामध्ये सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या त्या जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Chanakya Niti । शत्रूवर सहज विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्यांच्या लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी