Site icon e लोकहित | Marathi News

Buldhana Accident News । 31 डिसेंबरच्या रात्री मोठा अपघात! मद्यधुंद कारचालकाने ३ ते ४ वाहनांना चिरडलं

Buldhana Accident News

Buldhana Accident News । 31 डिसेंबर रोजी राज्यसह देशभरामध्ये नवीन वर्षाचे स्वागत हे जल्लोषात केले जातं. मात्र एकीकडे स्वागत करत असताना दुसरीकडे बुलढाण्यामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री मोठा अपघात झाला आहे. मद्यधुंद कारचालकाने दारूच्या नशेत तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

Viral Video । लाईव्ह रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराने तरुणाला मारली थेट कानाखाली; पाहा Video

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधून चार तरुण प्रवास करत होते. यावेळी कारचालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत होता. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट चार गाड्यांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. शेगाव-बाळापुर मार्गावर हा अपघात झाला आहे. (Buldhana Accident News)

Jalgaon News । पोहायला गेला तो परतला नाही, पाण्याचा अंदाज न आल्याने चिमुकल्याचा मृत्यू

या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना शेगाव-बाळापुर महामार्गावर घडली आहे. रविवारी रात्री ८च्या सुमाराची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Fire । मोठी बातमी! संभाजीनगर आग दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची मदत

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Apple days sale । सोडू नका अशी संधी! iPhone 15 वर मिळतेय थेट 30 हजारांची सवलत

Spread the love
Exit mobile version