
Buldhana Bus Accident । बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यास सुरवात केली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. जखमींनमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून जवळपास २० ते २२ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तेथील उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात मालवाहू ट्रक आला आणि हा भीषण अपघात झाला आहे.
Abhishek Ghosalkar । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!