Site icon e लोकहित | Marathi News

Buldhana News । महाराष्ट्रात या गावात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; तीन दिवसांत लोक होतात टकले

Buldhana News

Buldhana News । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात सध्या एका अज्ञात व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. या व्हायरसामुळे नागरिकांना अचानक टक्कल पडण्याची समस्या उद्भवली आहे. अवघ्या तीन दिवसांत लोकांच्या डोक्याचे केस गळून टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

HMPV । सावधान! भारतासाठी धोक्याची घंटा, HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरसची लक्षणं सुरुवातीला डोक्याला खाज सुटण्याची आणि नंतर केस गळण्याची असतात. तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णपणे टक्कल पडण्याची घटना घडते. अनेक कुटुंबांतील सदस्य एकाच वेळी या समस्येचा बळी ठरत असून, या अज्ञात व्हायरसचे संक्रमण लवकरच एक मोठ्या प्रमाणावर पसरले आहे.

Pune News । पुण्यातील रिक्षाचालकांसाठी नवा नियम, …नाहीतर परवाना होईल रद्द!

विशेष म्हणजे महिलाही या व्हायरसपासून वाचू शकल्या नाहीत. या व्हायरसचा प्रसार शेगाव आणि आसपासच्या भागात झपाट्याने झाला असून, प्रशासन मात्र अजूनही यावर ठोस उपाययोजना करत नाही. लोकांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.

Santosh Deshmukh Case । सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक; आरोपींना पळवण्यास मदत केली

तज्ञ डॉक्टर्स यावर शंकेत आहेत की, हे शांपू किंवा अन्य केमिकल्समुळे होऊ शकते, पण ज्या लोकांनी कधीच शांपू वापरला नाही, त्यांचंही केस गळत आहेत. त्यामुळे हे एक नवा आणि अज्ञात व्हायरस असल्याचं तज्ज्ञ मानत आहेत. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, उपचार शिबिरे लावण्याची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh case । संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीला मोठं आव्हान, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता

Spread the love
Exit mobile version