
सध्याच्या काळात बैलगाडा प्रेमी हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे प्रमान देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बैलगाडी शर्यतीला सरकारने देखील अधिकृतपणे मान्यता दिली आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी हे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करतात. शिरूर मधील कासारी हद्दीत बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन आलेल्या बैलाने युवकाच्या पोटात शिंग खुपसले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हार्दिकने सिनिअर खेळाडूंना घातल्या शिव्या? पाहा Video
ऋषिकेश राऊत, दिनेश राऊत आणि वृषाल राऊत हे बैलगाडाप्रेमी बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडाला कासारी येथे घेऊन गेले होते. त्यावेळी ते बैलगाडा खाली उतरवत असताना बैलाने वृषालच्या पोटामध्ये शिंग खुपसले. व त्याच ठिकाणी वृषालचा मृत्यू झाला. या सर्व घटनेबद्दल योगेश अरुण राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली.
स्फोटामुळे डेअरीफार्मला लागली भीषण आग; १८ हजार गायींचा दुर्दैवी मृत्यु
वृषाल जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केले होते परंतु त्याचा मृत्यू झाला होता. वृषालच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली आहे. पुढील सर्व घटनेचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींनी काळजी घ्यावी आवाहन केले जात आहे.
“तरुण हेअर कट करायला गेला अन् आगीने त्याला…”, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ