महाराष्ट्र (Maharashtra) राज्यासह देशात लम्पी (Lumpy) रोगाने धुमाकूळ घातला आहे. या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (District) जनावरांना हा रोग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (farmers)चिंता वाढली आहे. दरम्यान सरकारकडून(Government) शेतकऱ्यांच्या जनावरांचा (animals) लम्पी रोगाने मृत्यू झाल्यास मदत केली जाणार आहे. आजारापासून गुरांना वाचवण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत 75 हजारांहून अधिक गुरांचा लम्पी विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १८७ जनावरे या आजाराला बळी पडली आहेत. तसेच या रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे.
बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.
Amol Mitkari: “…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळणार” , राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचे भाकीत चर्चेत