Business idea । आपण हिरवी भेंडी (Green Okra) पाहिली असेल, ती खाल्लीही असेल. परंतु तुम्ही कधी लाल भेंडी (Red Okra) खाल्ली आहे का? अनेकांनी तर लाल भेंडी पाहिलीही नाही, तर खाण्याचा प्रश्नच येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने लाल भेंडी हिरव्या भेंडीच्या (Okra) तुलनेत खूप फायदेशीर असते. लाल भेंडी अतिशय चविष्ट आणि पौष्टीकही असते. जरी ही भेंडी युरोपिय देशातील पिक असले तरी आता ही भेंडी भारतातही पिकवण्यात येत आहे. (Latest Marathi News)
मातीचा पीएच
वर्षातून दोनवेळा म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात आणि जून- जुलै महिन्यात लाल भेंडीची लागवड (Red Okra Cultivation) केली जाते. जर शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी असेल तर भेंडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लाल भेंडीच्या लागवडीसाठी मातीचा पीएच ६.५ ते ७.५ असावा. लाल भेंडीमध्ये जास्त पोषक तत्व असल्याने या भेंडीला बाजारात जास्त मागणी आहे.
लाल भेंडीचे वैशिष्ट्य
हिरव्या भेंडीच्या तुलनेमध्ये या लाल भेंडीचे पीक ४५ ते ५० दिवसांमध्ये येते. या भेंडीच्या एका रोपाला कमीत कमी ५० भेंड्या येतात. अशाप्रकारे एक एकर शेतीमध्ये ४० ते ५० क्विंटल लाल भेंडीचे उत्पादन घेता येते. अनेकदा हे उत्पादन ८० क्विंटलपर्यंत जाते. बाजारात या लाल भेंडीची किंमत ८०० रुपये (Red Okra Price) इतकी आहे. रंगामुळे या भेंडीला कीड लागत नाही.
लाल भेंडीमध्ये एंथोसायनिन नावाचे एक खास तत्व आढळते. जे गर्भवती महिला, तजेलदार त्वचा आणि मुलांचा मानसिक विकास करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. इतकेच नाही तर लाल भेंडीच्या सेवनामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची समस्याही खूप कमी होते. त्यामुळे आजच बहुगुणी आणि बहुपयोगी भेंडीची लागवड करून चांगला परतावा मिळवा.