सरकारी नोकरीसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या अधिकची माहिती

Bumper Recruitment for Govt Jobs Begins; Learn more

सरकारी नोकरीबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. ‘सरकारी नोकरी म्हणजे सुखाची भाकरी’ अशी म्हण गावाकडे प्रचलित आहे. कायम नोकरी, भरपूर पगार व सोयी सुविधा यामुळे सरकारी नोकरी लोकांना हवीशी वाटते. सरकारी नोकरी हवी असणाऱ्या लोकांसाठी नुकतीच एक आनंदाची गोष्ट जाहीर झाली आहे. राज्यसरकारने सरकारी नोकरीच्या भरती संदर्भात एक नवीन माहिती दिली आहे.

Viral video| दारू पिणाऱ्या माणसांचा हा स्ट्रगल तुम्ही पाहिलाय का?

महाराष्ट्र शासनाकडून महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून mahagenco.in या वेबसाईटवर याबाबतीत सर्व माहिती देण्यात आली आहे.

थेट ऊसवाहतूकदारांना चोप देण्याचा इशारा; अपघात टाळण्यासाठी ‘या’ गावाची अनोखी शक्कल

MAHAGENCO मधील अभियंता पदासाठी 661 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी सध्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा यामध्ये समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठीचा अर्ज हा ऑनलाइन उपलब्ध आहे.

Viral Photo: विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने गुपचूप केलं लग्न?

या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेची अट ठरविण्यात आली असून या संदर्भात सर्व माहिती महानिर्मिती औष्णिक वीज केंद्राच्या mahagenco.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

Shrigonda: विसापूर फाट्यावजवळ भीषण अपघात; दोन जागीच ठार तर दोन जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *