
राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सतत टीका करत आहे. यामध्येच आता आता ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
सुभाष देसाई म्हणाले, ” रावणाच्या हातामध्ये धनुष्यबाण शोभून दिसत नाही धनुष्यबाण हा रामाच्या हातात शोभून दिसतो, तुम्ही धनुष्यबाण घेऊन आलात, तर आम्ही तुम्हाला मशालीने पळवून लावू. आणि ती दाढीपण जाळून टाकू,” असं खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
काल (दि.25) आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) व पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली. ‘मातोश्री’वर ही बैठक पार पडली. याबाबत विचारले असता सुभाष देसाई म्हणाले, “नवी समीकरणं अख्या देशात जुळत आहेत. त्यामुळे इंदिरा गांधीच्या वेळेला जसा प्रकार झालेला तशाप्रकारे देश एकटवून हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखणार”. असं देसाई म्हणाले आहेत.
बिग ब्रेकिंग! नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ