Site icon e लोकहित | Marathi News

संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषिमंत्र्याचे पुतळा दहन

Sambhaji Bridge

यावर्षी अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची पिके जळून गेली होती.कृषी खात्याने आणि विमा कंपन्यांनी याचे पंचनामे देखील केले होते.राज्याच्या कृषीमंत्री यांनी विमा कंपन्यांना दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची अग्रीम रक्कम सोडण्याचे आदेश देखील दिले होते.दिवाळी होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची अग्रीम रक्कम जमा झाली नाही.विमा कंपन्यांवर सरकारचा वचक दिसत नाही नाही.

Breaking News | अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार

शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना कुठं थोडा फार कांदा शेतकऱ्यांच्या हाती लागला होता त्या कांद्यावर मार्च पर्यंत निर्यातबंदी लावून सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती मिसळण्याचे काम केले आहे.या निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव 45 रुपये प्रति किंट्टल वरून 22 रुपये किंट्टल वर आले याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

Manoj Jarange Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावली; डॉक्टरांकडून तपासणी सुरु

सरकार एकीकडे सांगते शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करावा आता दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध व्यवसाय सुद्धा अडचणीत आला आहे.दुधाचे दर वाढविण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे.उसाला यावर्षी कुठं चांगलं भाव मिळू लागला तर केंद्र सरकारने उसा पासून इथेनॉल निर्मिती ला बंदी घातली आहे.कापूस,तूर,सोयाबीन हे शेतकऱ्याची पिके मार्केटला यायच्या आधीच सरकार ने कापूस गाठी ,तूर,सोयाबीन आयत करून या पिकांचे भाव पाडले आहे.मागील वर्षी सतत संतधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा सरकार ने अजून नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही.


Viral Video । नवरदेव घोड्यावर बसला होता, काही वेळातच लग्न लागणार होत मात्र घोड्याचं कृत्य पाहून सर्वच झाले थक्क; पाहा व्हिडीओ

यावर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना सरकारने त्वरित मदत करावी अश्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे कृषिमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हे सरकार शेतकरी विरोधी असून यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र मध्ये सर्व कार्यक्रम उधळून लावण्यात येतील अशा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनावेळी देण्यात आला.

50MP कॅमेरा आणि 5400mAh बॅटरीसह Realme C67 5G या दिवशी होणार लॉन्च!

यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, संभाजी ब्रिगेड अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे,तालुका अध्यक्ष नानाजी शिंदे शहर अध्यक्ष विजय वाघमारे,योगेश देशमुख,माऊली कण्हेरकर,बाप्पू गंगारडे,अमोल घोडके, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Big Accident । भीषण अपघात, ट्रक आणि पिकअपच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version