Bus Accident । होळीच्या दिवशीच घडलं भयानक, प्रवाशांनी भरलेली बस कोसळली दरीत; अनेक प्रवाशी…

Accident News

Bus Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे . अमरावती जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले असून यामधील पाच जणांची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

Topers Ad

Vijay Shivatare । ब्रेकिंग! विजय शिवतारे यांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय

या बसमधून एकूण २० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. याबाबत अधिकची माहिती अशी की, परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान, म्हणाले; “मला तडीपार…”

या अपघातामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतदेह बसमध्येच अडकले असून ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Abhijeet Bichukale । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेंची सर्वात मोठी घोषणा

Spread the love