Site icon e लोकहित | Marathi News

bus accident । बिग ब्रेकिंग! मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अतिशय भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू तर अनेक प्रवाशी गंभीर

Raigad Khopoli Private bus accident

Raigad Khopoli Private bus accident । दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढतच आले आहे. यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर होणाऱ्या अपघातात मध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील रायगडच्या खोपोली हद्दीत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Sukhdev Singh Gogamedi । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सुखदेव सिंह गोगामेडींच्या मारेकऱ्यांना अटक, ‘ती’ एक चूक पडली महागात

हा अपघात पुणे लेनवर झाला आहे. ही खाजगी बस एका ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अज्ञाताने वाहनाला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांनी दिली आहे.

Animal movie । मोठी बातमी! अॅनिमल चित्रपटातील काढून टाकलेले सीन सोशल मिडीयावर व्हायरल, ‘नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये….’

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची मदत करण्यास सुरुवात केली. या अपघातामध्ये दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बस चालकाला खोपोली नगरपालिका रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल आहे.

Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, दोन बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

Spread the love
Exit mobile version