Bus Accident । सर्वात मोठी बातमी! दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिंदे गटाच्या बसला भीषण अपघात; 25 जण जखमी

Bus Accident

Bus Accident । काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. या ठिकाणी अनेक ठिकाणाहून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही जण टू व्हीलरवर, काही फोर व्हीलरवर तर काही कार्यकर्ते बस करून आले होते. मात्र हा दसरा मेळावा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदे गटाच्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरापूर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

Gopichand Padalkar । धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

या अपघातामध्ये 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सर्व जखमी लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर शहरापूर जवळ शिंदे गटाची बस दसरा मेळाव्यावरून मुंबई ते सिल्लोड असा प्रवास करत होती. यावेळी या बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिली आणि बस डिव्हायडरला आढळल्याने हा भीषण अपघात झाला. (Shahapur News)

हेल्थ मिनिस्टर स्त्री आरोग्याचे महत्त्व सांगणारा एक आगळावेगळा कार्यक्रम

त्यानंतर ट्रकला मागून शिंदे गटाच्या दुसऱ्या बसने देखील जोरदार धडक दिली आणि ही बस देखील उलटली आणि अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 25 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या जखमी लोकांवर शहरापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Gujarat Bridge Collapse । मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा जागीच मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

Spread the love