Site icon e लोकहित | Marathi News

Bus Accident । मुलांच्या किंचाळण्याचा आवाज, सगळीकडे आरडाओरडा; सहलीच्या बसचा भीषण अपघात, 45 विद्यार्थी जखमी

Bus Accident

Bus Accident । कर्नाटकातील हावेरी येथे स्कुल बसचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूल बस उलटली असून चालकासह चार मुले गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय 12 मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारला टाळण्यासाठी बसचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला.

Amol Kolhe । सर्वात मोठी बातमी! अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावले खडे बोल; म्हणाले,”माझ्यावर टीका करण्यापेक्षा…”

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कूल टूर बस रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर तालुक्यातील सज्जनगुड्डा येथील सरकारी शाळेची आहे. सज्जनगुड्डा येथील शासकीय शाळेतील विद्यार्थी मंगळवारी हावेरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सहलीला गेले. येथील उत्सव रॉकगार्डकडे जात असताना सावनूर तालुक्यातील अल्लीपुरा क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या कारला टळत बसचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली.

Wrestler Rahul Gandhi | मोठी बातमी! राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, हरियाणात बजरंग पुनिया सोबत रंगला डाव

यावेळी बसमध्ये ५३ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करत होते. या घटनेत बस चालकासह तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हुबळी येथील KIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 12 मुलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सावनूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

Pandharpur Accident News । ब्रेकिंग! पंढरपूरमध्ये मृत्यूतांडव! भीषण अपघातात कारचा चक्काचूर; 4 जण जागीच ठार

सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. स्थानिक शाळेत मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सावनूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही घटना सावनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Accident News । लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला! कारचा भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्यासह ३ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love
Exit mobile version