Bus Accident News । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! १ जणाचा जागीच मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी

Bus Accident News

Bus Accident News । अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे, रस्ते कितीही चांगले बनवले असले तरी अपघाताचे प्रमाण हे वाढतच आहे. (Wardha Accident) चालकाचे नियंत्रण सुटून किंवा अन्य इतर कारणांमुळे अपघात हे घडतच आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट या ठिकाणी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. (latest News Update)

Sikkim Rain News । सिक्कीममध्ये निसर्गाचा कहर, ढगफुटीमुळे मोठा पूर; लष्कराचे 23 जवान बेपत्ता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर यामध्ये आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर हैदराबाद महामार्ग (Nagpur Hyderabad Highway) क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुना कंपनी जवळ छोटी आर्वी शिवारामध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Ajit Pawar । चंद्रकांत पाटलांना डच्चू, अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद, चंद्रकांत दादांकडे कोणती जबाबदारी?

ही बस हैदराबाद वरून रायपूरला निघाली होती मात्र गुरुवारी पहाटेच्या सुमारासच या बसचा अपघात झाला. या बसमधून जवळपास 28 प्रवासी प्रवास करत होते प्रवासी. साखर झोपेतच असताना हा अपघात झाला. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Mla Disqualification Case । बिग ब्रेकिंग! शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेवरील सुनावणीसंदर्भात समोर आली मोठी बातमी

Spread the love