Bus Accident । भीषण अपघात! बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

Tamil Nadu Bus Accident

Tamil Nadu Bus Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी एक बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Viral Video | मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात दोन संघांमध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी लोकांना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर अपघाताची माहिती मिळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्यास सुरुवात केली.

OBC Reservation । अखेर ओबीसी समाजाचे आंदोलन मागे, फडणवीस म्हणाले; “आरक्षण देण्याची भूमिका आहे पण..”

याबाबत अधिकची माहिती अशी की, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास तामिळनाडूमधील मारापलमजवळ पर्यटक बस कोसळली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये जवळपास 25 प्रवासी होते.

Menstrual cycle । मोठी बातमी! मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी, ‘या’ विद्यापीठाचा निर्णय

Spread the love