Bus Accident । ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली

Kolhapur Travels Accident News

Bus Accident । कोल्हापूर जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोव्यावरून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदी पात्रात कोसळली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Sharad pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार; बडा नेता सोडणार पक्षाची साथ

त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं. हा अपघात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस 15 ते 20 प्रवाशांना घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती.

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात भर रस्त्यात प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार, कोट्यवधीचे दागिने लुटले

पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट वारणा नदी पात्रात कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. (Kolhapur Travels Accident News)

Sharad Pawar-Uddhav Thackeray । शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा

Spread the love