
Bus Accident । परभणी जिल्ह्यात बुधवारी सकाळी राज्य परिवहन बस पुलावरून पडून बसमध्ये प्रवास करणारे सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अपघाताच्या वेळी बस परभणीतील जिंतूरहून सोलापूरच्या दिशेने जात होती. या अपघातामुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Abhishek Ghosalkar । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; धक्कादायक CCTV फुटेज समोर

अपघात कसा घडला?
बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असलेल्या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली येथील पुलावरून बस पडल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली.
Ajit Pawar । अजित दादांनी खेळली मोठी खेळी
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसांनी सांगितले की, जखमींना सुरुवातीला जिंतूर येथील वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले आणि नंतर सर्वांना परभणी शहरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.