
Accident News । मुंबई : लवकरच लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या जल्लोषात साजरा करतात. यंदाही तो तितक्याच जल्लोषात साजरा केला जाईल. ठिकठिकाणी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. परंतु त्यापूर्वी या उत्सवाला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यात एक ठार तर १९ प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
Palghar Crime । माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या चिमुरडीचा आईने घेतला जीव, धक्कादायक कारण समोर
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) घडला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईवरून अनेक जण गावी चालले होते. परंतु माणगाव जवळ रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान एस.टी बसने कंटेनरला मागून धडक (Mumbai-Goa Highway Accident) दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. १९ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Devastating floods । धक्कादायक! धरण फुटल्याने शहर उद्ध्वस्त, 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती
या अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात बसमधील जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
Eknath Shinde । आमचं सरकार फक्त घोषणा नाही करत तर अंमलबजावणी करते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे