एखाद्याकडे मला असेल तर तो दगड सुद्धा विकू शकतो, असे म्हंटले जाते. माणसाकडे असणाऱ्या कलागुणांचा आणि डोक्याचा व्यवस्थित वापर केला तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. कर्नाटक मधील जयगुरु नावाच्या तरुणाने असंच काहीसं करत आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. इंजिनिअर असणाऱ्या जयगुरू या तरुणाने हातातली चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय (Startup) सुरू केला. यामधून आता तो त्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे कमवत आहे.
२६ वर्षाच्या जयगुरु याने स्वतःचा दुग्धव्यवसाय ( Dairy Farming) सुरू केला. यासाठी त्याने १३० गाई आणि १० एकर जमीन खरेदी केली. मात्र दुग्धव्यवसाय तर सगळेच करतात. आपण यातूनच काहीतरी वेगळे करूयात अशा विचाराने जयगुरुने शेणखताचा व्यवसाय सुरू केला. यामुळे त्याला दुगधव्यवसायासह शेणखत ( Cowdung) विक्रीतून सुद्धा प्रचंड पैसे मिळू लागले.
शेणखतासाठी जयगुरुने शेण पटकन वाळवून त्याचा भुगा करणारी मशीन खरेदी केली. यामधून तो दर महिन्याला १०० पोती शेणखत विकतो. तसेच रोज गोठा स्वच्छ करताना वापरलेले पाणी साठवून खत म्हणून विकतो. एकीकडे होणारे दुग्धउत्पादन व दुसरीकडे शेणखत विक्री यामधून जयगुरु दर महिन्याला १० लाख कमावतो.
Ajit Pawar | ‘ती’ आमची सर्वात मोठी चूक; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा!