
आपल्या आजूबाजूला भरपूर गोष्टी असतात, ज्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. नांदेडमधील (Nanded) पावडे दाम्पत्यांने देखील अशाच एका गोष्टीपासून महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. शेवग्याच्या पानांची पावडर (Drumstick leaves powder) तयार करून हे दोघेही मोठी आर्थिक उलाढाल करणारा व्यवसाय करत आहेत.
Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा झटका बसणार? राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला
नांदेड मधील उच्चशिक्षित आणि आयटी इंजिनिअर असणाऱ्या या जोडप्याने हातात असणारी लाखो रुपयांची नोकरी सोडून हा व्यवसाय (Business) सुरू केला आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय असल्याचे हे दोघेही सांगतात. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे अशी या दोघांची नावे असून त्यांनी बनवलेल्या पावडरला पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी आहे.
झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! केवळ अडीच लाख रुपयांमध्ये मिळणार घर
मंजुषा पावडे यांना जवळपास १ लाख २० हजार आणि त्यांचे पती गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाखांचे पॅकेज होते. मात्र नोकरी सोडून शेतीच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय करण्याचे ठरविले. हैदराबाद मध्ये कामानिमित्त वास्तव्यास असताना या दोघांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! चुकीचा टाईप झालेला मेसेज करता येणार एडिट; जाणून घ्या सविस्तर…
यामध्ये त्यांनी शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहेत ? शेवग्याची लागवड कशी करावी ? यामधून उत्पन्न किती मिळेल ? याची संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला. डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शेवग्याची पावडर खरेदी करीत करतात. असे पावडे दाम्पत्याचे म्हणणे आहे.
फायनलआधीच चेन्नईच्या ‘या’ बड्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, “मला समोर मुंबईची टीम नकोय”