मुंबई: मानसी नाईक सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. मानसीने तिच्या पतीपासून वेगळं होण्याची माहिती देखील दिली होती. त्यानंतर ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आहे, आता देखील तिने एक वर्कआऊटचा व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.
पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे, भाजपच्याच जेष्ठ नेत्याने केले नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
मानसीने जिममधील वर्कआउटचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “कधीकाळी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन रडले पण आता रडताना बाथरूम मध्ये नळ सोडून रडते, आता पश्चाताप नंतर करा किंवा स्वतःचा विकास करा, कधीच हार मानू नका,” असे कॅप्शन दिले आहे.
Sai Pallavi: ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
ब्रेकिंग! पोलीस बंदोबस्त असून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने ११ पोलीस कर्मचारी निलंबित